सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर जि. ठाणे येथे दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठिक १०:०० वा. ते दुपारी ३: ०० वाजेपर्यंत महाविद्यालतील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष, एन. सी. सी., एन. एस. एस., सांस्कृतिक विभाग, स्पोर्टस् विभाग, महिला विकास कक्ष, एच. डी. एफ. सी. बँक (परिवर्तन) आणि सर जे. जे. महानगर रक्तपेढी (शासकीय रक्तपेढी), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्ञानवर्धिनी संस्थेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष मा. श्री. बाळा पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर अधिकारी, सचिव मा. श्री. दिलीप भोपतराव यांच्या हास्ते झाले. सदरप्रसंगी संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य मा. श्री. बाळासाहेब खारीक, मा. श्री. अरुण कासार, मा. श्री. दिपक बजाज, मा. श्री. अनिल निचिते, मा. श्री. वैभव जगे, मा. श्री. संदिप महाजन, सदस्या मा. श्रीमती आपर्णाताई खाडे, विश्वस्त समिती सदस्य मा. श्री. मोरेश्वर भागवत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डाॕ. ए. के. सिंह, एच. डी. एफ. सी. बँकेचे (परिवर्तन) डेप्युटी व्हाईस प्रसीडेंट मा. श्री. सुनिल जाधव, सीनिअर मॕनेजर मा. श्री. मंदार चव्हाटे, सीनिअर मॕनेजर मा. श्री. हर्षद बर्वे, तसेच सर जे. जे. महानगर रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी मा. श्री. अजय भिसे, मा. श्री. डाॕ. सचिन चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मा. श्री. अजय भिसे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून, विद्यार्थ्यांना समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच सदर रक्तदान शिबिरामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, मानवतेची आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या शिबिरात एकूण २७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले व त्यातुन एकूण २७ बॕग रक्त जमा करुन ते सर जे. जे. महानगर रकतपेढी, मुंबई यांना देण्यात आले.
सदर रक्तदानादरम्यान एच. डी. एफ. सी. बँकेतर्फे सर्व रक्तदात्यांना एक गिफ्ट, प्रमाणपत्र, चहा, बिस्कीट व अल्पोपहार देण्यात आला.
या शिबिराला महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक नागरीक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदरचे रक्तदान शिबिर एच. डी. एफ. सी. बँक (परिवर्तन) आणि सर जे. जे. महानगर रक्तपेढी, मुंबई यांच्या विशेष सहकार्यामुळे यशस्वीरीत्या पार पडले.